मका पीक हे महाराष्ट्रातील तृणधान्यातील प्रमुख असे पीक आहे .मका चा वापर जनावर चारा तसेच ग्लुकोस

 अल्कोहोल तसेच इतर पदार्थात केला जातो .

मका पिकासाठी आवश्यक मातीची गुणवत्ता - १.या पिकासाठी मध्यम काली गाळाची मृदा तसेच उत्तम 

पाण्याची  निचरा होणारी जमीन उत्कृष्ट असते .

२.मातीचा सामू हा ६.५ ते ७.६ असावा .

३.जमीन चोपण नसावी .

आवश्यक हवामान - १.पीक उगवणीसाठी तापमान १८ डी.से . पेक्षा कमी नसावे ,तसेच ३५ डी.से पेक्षा जास्तही नसावे यामुळे उत्पादनात घट होते .

२. धुक्याच्या वातावरणात पीक उत्तम येत नाही .

३. मका पीक वाढीसाठी उपयुक्त तापमान हे २५ ते ३० डी.से . असे आहे .

पेरणीपूर्वी ची मशागत -पेरणीपूर्वी  जमिनीची खोल नांगरट करून १५-२५ टन कुजलेले शेण खत टाकावे तसेच रोटरच्या साहाय्याने माती भुसभुशीत करावी .

माकाची सुधारित वाण- १. ८० ते ९० दिवसात येणारे वाण -सूर्य ,पारस, किरण , महिकांचन, अरुण . व संकरित वाण एफएच -३२११ , एफक्‍युएच- ४५६७ हे आहेत 

२. ९० ते १०० दिवसात येणारे  संकरित वाण डीएमएच १०७ , केएच ९४५१  हि आहेत व बागायती नवज्योत  ,मांजरी हे वाण आहे .

३. १०० ते १२० दिवसामध्ये येणारे आफ्रिकन टॉल हे  जनावऱ्यांच्या  चाऱ्यासाठी  उपयुक्त आहे .

पेरणी पद्धत - १.लवकर येणाऱ्या वाणात दोन ओळींतील अंतर ६० सेमी तसेच दोन रोपातील अंतर २० सेमी  ठेवावे . 

२.पेरणी साठी एकरी ८-१० किलो बियाणे लागते.

३.पेरणीअगोदर बीजप्रक्रिया करून घ्यावी .त्यासाठो २-३ ग्राम थायरम चा वापर करावा 

का पिकासाठी रासायनिक खत नियोजन -मका पिकासाठी नत्र ची खूप गरज असते .हेक्टरी १२० किलो नत्र ,६० किलो स्फुरद ,६० किलो पालाश ची गरज भासते .नत्र ३ टप्प्यात पिकाला द्यावे पेरणी वेळी ४० किलो ,नंतर १५-२० दिवसाच्या अंतराने ४०-४० किलो  नत्र द्यावे  . 

कीड नियंत्रण -


पिकामध्ये पाने खाणारी अळीचा अटॅक हा भरपूर ठिकाणी 

पाहावयाला मिळतो .त्यासाठी उपाय

 म्हणजे डेलिगेट १८० मिली प्रति २०० लिटर पाण्यात वापरावे यामुळे 

किडीचे नियंत्रण होते .

तसेच डिमेथोएट चा  १.२ मिली /१ लिटर याचाही वापर आपण करू शकता .