मका पीक हे महाराष्ट्रातील तृणधान्यातील प्रमुख असे पीक आहे .मका चा वापर जनावर चारा तसेच ग्लुकोस
अल्कोहोल तसेच इतर पदार्थात केला जातो .
मका पिकासाठी आवश्यक मातीची गुणवत्ता - १.या पिकासाठी मध्यम काली गाळाची मृदा तसेच उत्तम
पाण्याची निचरा होणारी जमीन उत्कृष्ट असते .
२.मातीचा सामू हा ६.५ ते ७.६ असावा .
३.जमीन चोपण नसावी .
आवश्यक हवामान - १.पीक उगवणीसाठी तापमान १८ डी.से . पेक्षा कमी नसावे ,तसेच ३५ डी.से पेक्षा जास्तही नसावे यामुळे उत्पादनात घट होते .
२. धुक्याच्या वातावरणात पीक उत्तम येत नाही .
३. मका पीक वाढीसाठी उपयुक्त तापमान हे २५ ते ३० डी.से . असे आहे .
पेरणीपूर्वी ची मशागत -पेरणीपूर्वी जमिनीची खोल नांगरट करून १५-२५ टन कुजलेले शेण खत टाकावे तसेच रोटरच्या साहाय्याने माती भुसभुशीत करावी .
माकाची सुधारित वाण- १. ८० ते ९० दिवसात येणारे वाण -सूर्य ,पारस, किरण , महिकांचन, अरुण . व संकरित वाण एफएच -३२११ , एफक्युएच- ४५६७ हे आहेत
२. ९० ते १०० दिवसात येणारे संकरित वाण डीएमएच १०७ , केएच ९४५१ हि आहेत व बागायती नवज्योत ,मांजरी हे वाण आहे .
३. १०० ते १२० दिवसामध्ये येणारे आफ्रिकन टॉल हे जनावऱ्यांच्या चाऱ्यासाठी उपयुक्त आहे .
पेरणी पद्धत - १.लवकर येणाऱ्या वाणात दोन ओळींतील अंतर ६० सेमी तसेच दोन रोपातील अंतर २० सेमी ठेवावे .
२.पेरणी साठी एकरी ८-१० किलो बियाणे लागते.
३.पेरणीअगोदर बीजप्रक्रिया करून घ्यावी .त्यासाठो २-३ ग्राम थायरम चा वापर करावा
मका पिकासाठी रासायनिक खत नियोजन -मका पिकासाठी नत्र ची खूप गरज असते .हेक्टरी १२० किलो नत्र ,६० किलो स्फुरद ,६० किलो पालाश ची गरज भासते .नत्र ३ टप्प्यात पिकाला द्यावे पेरणी वेळी ४० किलो ,नंतर १५-२० दिवसाच्या अंतराने ४०-४० किलो नत्र द्यावे .
कीड नियंत्रण -
पिकामध्ये पाने खाणारी अळीचा अटॅक हा भरपूर ठिकाणी
म्हणजे डेलिगेट १८० मिली प्रति २०० लिटर पाण्यात वापरावे यामुळे
किडीचे नियंत्रण होते .
तसेच डिमेथोएट चा १.२ मिली /१ लिटर याचाही वापर आपण करू शकता .


2 Comments
मका या पिकाबद्दल खूप महत्त्वपूर्ण माहिती आहे धन्यवाद
ReplyDeleteआपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.आमच्या बद्दल चे आपले प्रेम असेच राहूद्या
Delete