ज्वारी पीक का घेतले जाते ? -
पूर्वी पासून पारंपरिक पद्धतीने हे पीक मनुष्याच्या उदरनिर्वाहासाठी घेतले जाते .धान्याचा उपयोग आहारात तर कडब्याच्या उपयोग हा जनावरांच्या चाऱ्या साठी केला जातो .
ज्वारी पिकासाठी उपयुक्त मृदा -
ज्वारी हे पीक काळी माती ,तसेच मध्यम काळी माती यामध्ये उत्तम येते .
मातीचा PH जर आम्लयुक्त म्हणजेच ५.६ असला तरी हे पीक त्यामध्ये येते .
ज्वारी या पीक उत्पन्नासाठी महाराष्ट्रातील अग्रेसर जिल्हे -
उस्मानाबाद ,नांदेड ,यवतमाळ, परभणी ,बुलढाणा ,अमरावती ,कोल्हापूर ,अहमदनगर .
उपयुक्त हवामान -
ज्वारी पीक हे उष्ण वातावरणात याची लागण घेतली जाते .ज्वारी हे पीक २५ते ३३ डी.से तापमानात उत्तम येते .
लागणी पूर्वीची मशागत -
ज्वारी पिकासाठी ५ ते ६ से .मी . खोल नांगरट असेल तर या पिकाची वाढ जोमात होते तशेच पिकाच्या मुळ्या खोलवर जातात . तसेच बागायती पिकासाठी १२ ते १५ टन शेणखत प्रति हेक्टर व कोरडवाहू साठी ७ ते ८ टन प्रति हेक्टर लागते .यामध्ये शेणखत कींव्हा इतर कंपोस्ट खते वापरली तरी चालतील.
बीजप्रक्रिया -
पूर्वी पासून साठवलेलं बियाणे व्यवस्थित न साठविल्याने पीक उगवल्यानंतर कायनी या रोगाला हे पीक बळी पडते .त्यासाठी उपाय म्हणून बीजप्रक्रिया ही गरजेची आहे .१ किलो बियाण्यासाठी १.५ हे २ ग्राम THIRUM चा वापर किंवा गंधक चा वापर ४ ग्राम प्रति किलो असा करावा .
लोकप्रिय वाण-
मालदांडी हे वाण बऱ्याच वर्षापासून प्रचलित आहे .तसेच काही AKSV-181 (PDKV KALYANI),PKV-ASHWINPARBHANI MOTI (SPV-1411),PARBHANI ज्योती,PHULE REVATI (SPV-1830),PHULE VASUDHA (SPV-1704),PKV Kranti (AKSV-9-R),PHULE SUCHITRA ,PHULE ANURADHA(SPV-1709) याही जाती नव्याने बनवल्या आहेत .
पिकाचा कालावधी -
वेगवेगळ्या वाणाचा वेगवेगळा कालावधी असतो .यामध्ये कमीत कमी ८० दिवस ते जास्तीत जास्त १३० दिवस असे वेगवेगळे वाण आहेत . सर्वात कमी कालावधीत येणारे वाण हे PKV-अश्विन हे आहे यासाठी ८०-८५ दिवस लागतेत.
आंतरमशागत -
कोळपणी होऊन सुद्धा जर पिकामध्ये तणाची मात्रा असेल तर २-४-D हे तणनाशक प्रति एकर ६०० मिली याप्रमाणे फवारणी केली असता तणांचा नायनाट होण्यास मदत होते .

0 Comments