वाटाणा हे पीक राज्यातील एक प्रमुख पीक असून याचा उपयोग हा हॉटेल मध्ये होतो तसेच ग्रीन पीस च्या स्वरूपात केला जातो .राज्यात नाशिक ,पुणे सातारा या ठिकाणी याचे प्रामुख्याने उत्पादन घेतले जाते .
उपयुक्त हवामान - वाटाणा पिकासाठी थंड हवामान उपयुक्त असते .१५ ते २२ डि.से . हवामान पिकाच्या वाढीस योग्य ठरते .१५ पेक्षा कमी व २२ पेक्षा जास्त तापमानाच्या ठिकाणे हे पीक घेणे टाळावे .
उपयुक्त माती- काली गाळाची तसेच हलकी पाण्याचा निचरा होणारी माती पीक वाढीसाठी उपयुक्त असते .
मातीचा सामू हा 5.5 ते 6.७ एवढा असावा .शेतकऱ्याने त्यासाठी माती परीक्षण करावे .
वाटाणा लागवडीचा/पेरणीचा हंगाम -वाटाणा पीक राज्यात दोन हंगामात म्हणजेच जून -जुलै तसेच नोव्हेंबर -डिसेंबर मध्ये घेतले जाते .
वाटण्याचे सुधारित वाण- वाटण्याचे सुधारित जाती दोन प्रकारच्या आहेत.
१ . अर्केल-कमी कालावधीत येणारे वाण हे आहे . या वाणातील वाटाणा हा ५० ते ५५ दिवसात शेंगा तोडणीस येतात .
२. बॉन्व्हेला -या वाणातील बियाणे ४५ दिवसामध्ये शेंगा तोडीस येतात .तसेच वाटाण्याच्या झाडांची उंची मध्यम असते
३. जवाहर १.-९० दिवसामध्ये शेंगा तोडीस येतात .शेंगा या गडद हिरव्या येतात .
बीजप्रक्रिया - मर हा रोग होऊ नये यासाठी बीजप्रक्रिया महत्वाची असते .त्यासाठी ५ ग्राम प्रति किलो किंवा ३-४ ग्राम प्रति किलो बियाण्यास वापरावे .
कीड व बुरशी नियंत्रण तसेच त्यावरील उपाय -
१ .मावा -
वरील चित्राप्रमाणे मावा या रोगाचा पिकावर प्राधुरभाव झाला असेल तर इमिडाक्लोप्रिड ८ मिली प्रति पंप याप्रमाणे
वरील चित्राप्रमाणे मावा या रोगाचा पिकावर प्राधुरभाव झाला असेल तर इमिडाक्लोप्रिड ८ मिली प्रति पंप याप्रमाणे
फवारणी करावी .
२. नागअळी -
जून -जुलै हंगामातील वाटाणा पिकावर याचाही जास्त परिणाम होतो .सतत होणाऱ्या पावसामुळे या अळीचा प्रधुरभाव जास्त होतो .या अळीच्या नियंत्रणासाठी अँप्लिगो ८ मिली प्रति पंप किंवा Bio R 303 चा २० मिली प्रति पंप असा वापर केला असता कीड नियंत्रण करता येते .(टीप -फुल अवस्थेत या कीटकनाशकांचा वापर करू नये .)

फुल अवस्थेत होणाऱ्या कीड नियंत्रणासाठी emamactin benzoin हे १० ग्राम प्रति पंप किंवा takumi १० ग्राम प्रति पंप वापर करावा .
३.काळी / पिवळी बुरशी (downy mildev ) -
जून -जुलै हंगामातील वाटाण्यावर काळी व हिवाळ्यातील हंगामावर पिवळी बुरशी चा प्रामुख्याने प्रधुरभाव होतो .त्यासाठी उपाय म्हणजे रासायनिक systematic fugicide चा वापर करावा .त्यामध्ये folicure ८ मिली प्रति पंप ,किंवा nativo १० ग्राम प्रति पंप किंवा shamir ३५ मिली प्रति पंप चा वापर करावा .

0 Comments