बीजप्रक्रिया का करावी ? -अवकाळी पडणार पाऊस तसेच वातावरणातील झालेल्या बदलामुळे कीड तसेच
बुरशीचे नियोजन करणे एक आव्हान आहे .सततच्या पावसामुळे मातीत वाढणारे बॅक्टरीया यामुळे बियाणे उगवण
क्षमता कमी होत चालली आहे यामुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होते .त्यासाठी शेतकऱ्यांनी पेरणी पूर्वी
बीजप्रकिया करणे गरजेचे आहे .बीजप्रक्रियेमुळे पेरलेल्या बियाण्याचे संरक्षण होते आणि पीक रोगाला बळी पडत
नाही .तसेच पिकांच्या मुळांचे संरक्षण होऊन पिकाच्या मुळांची जोमदार वाढ होते .
बीजप्रकिया कशी करावी -बीजप्रकिया शेतकरी आपल्या घरी तसेच मशीन च्या साहाय्याने करू शकतो .
१. घरगुती पद्धत - चित्रात दाखवल्या प्रमाणे बियाणे पोत्यावर अंथरून घ्यावे . ४० किलो बियाण्यासाठी 200-400 मिली
पाणी घेऊन त्यामध्ये bayer कंपनी चे gaucho हे ५० मिली याप्रमाणे पाण्यात ढवळून घ्यावे तसेच त्यामध्येकार्बेन्डाझीम (बाविस्टीन )हे ७० -८० ग्राम याप्रमाणे घ्यावे व हे मिश्रण ५-६ मिनिट ढवळून घ्यावे त्यानंतर प्लास्टिक
चे हातमोजे घालून द्रावण बियाण्यावर शिंपडावे .द्रावण बियाण्याच्या प्रत्येक भागावर लागेल याची काळजी घावी .
२.मशीन च्या साहाय्याने -
चित्रात दाखवल्याप्रमाणे machine च्या साहाय्याने बीजप्रक्रिया करता येते .बऱ्याच ठिकाणी machine उपलब्ध नसल्याने घरगुती पद्धतीचा वापर केला जातो .
बीजप्रक्रिया चे फायदे - १.बियाण्यांच्या उगवण क्षमतेत वाढ होते .
२.पीक निरोगी राहते .
३.मुळांची जोमदार वाढ होते .
४. परिणामी उत्पन्नात वाढ होते .व शेतकऱ्याला फायदा होतो .



0 Comments